संघर्षरत राहण्याची प्रेरणा देणाऱ्या स्त्रियांच्या कथा : 'भाकरी आणि कर्म'
शिरीष देशमुख
१२ फेब्रुवारी २०२६
'भाकरी आणि कर्म' हा उमेश मोहिते यांचा 'निवद' नंतरचा चौथा कथासंग्रह असून पहिलाच दीर्घकथासंग्रह आहे. यात एकूण पाच दीर्घकथा असून या कथा गावपातळीवरील सामान्य कष्टकरी वर्गाच्या संघर्षमय जीवनाचा वेध घेणाऱ्या आहेत आणि त्यांचा हा संघर्ष विविध पातळ्यांवरचा आहे. भाकरी कथेत पारबतीच्या वडिलांच्या घरच्या गरिबीमुळे तिचा सासू-सासऱ्यांकडून जाच होत असतो आणि ती हा जाच निमूटपणे सहन करीत दुसरीकडे नवऱ्याचे मनपरिवर्तन …